Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Snapchat Memories Features: सोशल मीडियाचे जग नेहमीच नवीन आणि ट्रेंडिंग कंटेंटने भरलेले असते. यातीलच एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणजे स्नॅपचॅट. याच लोकप्रिय अ‍ॅपने आचा त्यांच्या युजर्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2025 | 12:20 PM
Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो - व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो - व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Follow Us
Close
Follow Us:

स्नॅपचॅट हे एक लोकप्रिय ॲप आहे. स्नॅपचॅटवर फोटो क्लिक करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर्स दिलेले आहेत. या फिल्टर्सने लोकांना खरंच वेड लावलं आहे. कारण या फिल्टरच्या मदतीने लोकं वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो क्लिक करू शकतात. जसे की ब्लॅक अँड व्हाईट फोटो किंवा विदाऊट मेकअप लूक. असे वेगवेगळे फिल्टर स्नॅपचॅटमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय आपण रोज आपल्या मित्रांसोबत स्नॅप देखील शेअर करू शकतो आणि स्ट्रीक तयार करू शकतो. आपले लोकेशन आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. या फीचर्समुळे हे एक लोकप्रिय अ‍ॅप बनले आहे आणि याच ॲपमधील एक सर्वांचा आवडते फीचर म्हणजे मेमरीज.

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा

कंपनीने घेतला मोठा निर्णय

मेमरीजमध्ये युजर्सना त्याच दिवशी क्लिक केलेले 1 वर्षापूर्वीचे, 2 वर्षांपूर्वीचे असे फोटो आणि व्हिडीओ दिसतात. आतापर्यंत हे फीचर युजर्ससाठी मोफत उपलब्ध होते. मात्र आता स्नॅपचॅट युजर्स त्यांचं आवडतं फीचर फ्रीमध्ये वापरू शकणार नाहीत. कंपनीने घोषणा केली आहे की, ॲप आता जुने फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी पैसे घेणार आहे. 2016 मध्ये लाँच करण्यात आल्यापासून हे फीचर युजर्ससाठी मोफत उपलब्ध होते. मात्र आता असं होणार नाही. कंपनीच्या या घोषणेवर युजर्स खूश नाहीत आणि ते हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कधी द्यावे लागणार पैसे?

नवीन पॉलिसीअंतर्गत कंपनी 5GB हून अधिक स्टोरेज झाल्यास यूजर्सकडून पैसे घेणार आहे. कंपनीने जारी केलेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, ही पॉलिसी हळूहळू सर्व युजर्ससाठी लागू केली जाणार आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, 100GB वाल्या प्लॅनसाठी 1.99 अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 177 रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. तर 250GB वाल्या प्लॅनसाठी 3.99 डॉलर म्हणजेच सुमारे 355 रुपये खर्च करून Snapchat+ सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे. स्नॅपचॅटचे सध्या 90 कोटींहून अधिक मंथली एक्टिव यूजर्स आहेत आणि कंपनीचे म्हणणे आहे की त्यापैकी बहुतेकांकडे 5 जीबीपेक्षा कमी मेमरीज स्टोरेज आहे. नवीन निर्णयाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

पैसे दिले नाहीत तर काय होईल?

ज्या यूजर्सचे मेमोरीज स्टोरेज 5GB हून अधिक आहे, त्यांना एका वर्षापर्यंत टेंपरेरी स्टोरेज मिळणार आहे आणि त्यांच्याकडे त्यांची सेव्ह केलेला कंटेट डाउनलोड करण्याचा पर्याय असेल. एका वर्षानंतर त्यांना स्टोरेज प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. स्नॅपचॅट लाँच होऊन जवळजवळ एक दशक झाले आहे आणि आतापर्यंत त्यावर एक ट्रिलियनपेक्षा जास्त आठवणी जतन केल्या गेल्या आहेत.

Web Title: Users have to pay money for using snapchat memories feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा
1

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
2

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes
3

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
4

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.