'या' लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल लिंबू पाणी
लिंबू पाण्यात सायट्रिक आम्ल मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करू नये. यामुळे शरीरात आणखीनच पित्त वाढते.
लिंबूमधील सायट्रिक ऍसिडमुळे दातांच्या वरच्या थराला नुकसान पोहचते. दातांवर पांढऱ्या रंगाचा चिकट थर जमा होऊ लागतो. ज्यामुळे दात अस्वच्छ दिसू लागतात.
लिंबू पाण्यात ऑक्सलेट आढळून येते, ज्यामुळे पित्ताशयात खड्डे होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लिंबू पाण्याचे सेवन करावे. अन्यथा शरीरसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
सांधे दुखीची समस्या असलेल्या लोकांनी आहारात कधीच लिंबू पाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे सांध्यांमधील वेदना वाढून आरोग्याला हानी पोहचते.
आपल्यातील अनेकांना लिंबू किंवा आंबट फळांची ऍलर्जी असते. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी लिंबू पाणी किंवा आंबट फळांचे सेवन करू नये.