लांब नखांमुळे उद्भवतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
लहान नखांची तुम्ही सहज काळजी घेऊ शकता. पण नख वाढल्यानंतर त्यांची काळजी घेणे कठीण वाटू लागते. कारण नखाच्या खालील भागात घाण, बॅक्टेरिया आणि बुरशी सहजपणे जमा होते.
नखांमध्ये वाढलेले जंतू यंपाक करताना किंवा खाताना शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काम करताना नखांवर लागल्यानंतर नख तुटण्याची जास्त शक्यता असते.
लांबलचक नख नखांच्या मुळांवर जास्तीचा दबाव आणतात. त्यामुळे वस्तू पकडणे आणि इतर दैनंदिन कामे कठीण वाटू लागतात. फॅशनमुळे वाढवलेली नख तुटल्यानंतर खूप जास्त वेदना होतात.
लांब नखांवर घाण, भेगा आणि कडा वाढतात. या कडांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे नख पांढरेशुभ्र दिसण्याऐवजी काळी पडतात. नखांचे सौंदर्य पूर्णपणे कमी होऊन जाते.
वाढवलेल्या नखांची योग्य काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे, अन्यथा नख खराब होऊन त्यांचे सौंदर्य कमी होऊन जाते. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी लांब नख वाढवू नये.