भारताच्या वेगवेगळ्या भागात नववधूला परिधान करण्यास दिले जातात 'हे' पारंपरिक दागिने
काश्मिरी लग्नात नवरीच्या कानात पारंपरिक दागिने परिधान करण्यास दिले जातात. या दागिन्यांना देजहूर, अथूर आणि अत: असे म्हंटले जाते.
मणिपूरमध्ये नवरीच्या कानात लिकाचो हे कानातले घातले जातात. याशिवाय गळ्यात सुद्धा पारंपरिक दागिने परिधान केले जातात. हे दागिने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी परिधान केले जातात.
पंजाबी लग्नात नवीन नवरीच्या हातामध्ये लाल रंगाचा चुडा घातला जातो. यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यांचे एकत्र कॉम्बिनेशन करून चुडा बनवला जातो.
पश्चिम बंगालमध्ये नववधूच्या डोक्यावर शंखपोला आणि मुकूट घालण्याची पद्धत आहे. शंखाच्या बांगड्या आणि लाल प्रवाळाच्या बांगड्या बंगाली लग्नात परिधान केल्या जातात.
हिंदू लग्नात नववधूला मुंडावळ्या बांधण्याची परंपरा आहे. मोती किंवा वेगवेगळ्या रंगीत मोत्यांचा वापर करून मुंडावळ्या बनवल्या जातात. यामध्ये तुम्ही मोती किंवा फुलांच्या मुंडावळ्या बांधू शकता.