कांजीवरम साडीवर परिधान करा 'या' सुंदर डिझाइनचे टेम्पल ज्वेलरी झुमके
सगळ्यांचं झुमके घालायला खूप जास्त आवडतात. झुमके घातल्यानंतर लुक खूप सुंदर दिसतो. या डिझाईनचे झुमके कोणत्याही साडीवर किंवा साऊथ इंडियन लेहेंग्यावर अतिशय आकर्षक दिसतील.
टेम्पल दागिने वजनाने अतिशय हलके असतात. बाजारात १०० रुपयांपासून ते अगदी १० हजार रुपयांपर्यंत दागिने उपलब्ध आहेत. टेम्पल दागिन्यांमध्ये बारीक नक्षीकाम केले जाते.
काहींना लग्नात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात हेवी लुक हवा असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे कानातले ट्राय करू शकता. हे कानातले घातल्यानंतर अतिशय भरगच्च दिसतात.
मोराच्या डिझाईनचे कानातले महिलांना खूप जास्त आवडतात. त्यात तुम्ही हत्ती, मोर, देवी सरस्वती किंवा इतर डिझाईन असलेले दागिने खरेदी करू शकता.
स्टायलिश आणि मॉर्डन लुक हवा असेल तर तुम्ही टेम्पल डिझाईनचे इअर कफ घालू शकता. हे दागिने अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात.