manoj jarange patil mumbai morcha for maratha reservation
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा जरांगे पाटील यांचा मानस आहे. मात्र याला हाय कोर्टाने नकार दिला आहे.
Maratha Reservation:मराठा आरक्षणाचा एल्गार! मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा 'चलो मुंबई'ची हाक;
(Photo - X)
त्यानंतर शेवगाव, मिरी मका, पांढरीपुल, अहिल्यानगर बायपास मार्गे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येणार आहे. त्यानंतर नेप्ती चौक आणि आळेफाटा मार्गे पुढे जाणार आहे.
27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुक्काम हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नरमधील शिवनेरीमध्ये असणार आहे.
28 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत आणि दर्शन घेत जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पुढे मार्गस्थ होणार आहेत.
त्यानंतर राजगुरुनगर खेड मार्गे चाकण, तळेगाव, लोणावळा पार करत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे आगेकूच करणार आहे.
29 ऑगस्ट रोजी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण देण्याच्या मुख्य मागणीसह जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत.