Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…

Local Train Fight: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये दरवाजात उभे राहण्याच्या वादातून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी! मारहाणीत एक प्रवासी धावत्या लोकलमधून मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर कोसळला. सुदैवाने वेग कमी असल्याने जीव वाचला, मात्र घटनेचा धडकी भरवणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 07, 2026 | 05:01 PM
Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्...

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्...

Follow Us
Follow Us:
  • लोकलमधून प्रवासी खाली पडला
  • वेग कमी असल्याने जीव वाचला
  • व्हिडिओ व्हायरल; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Local Train Fight: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र गर्दी आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांचे सत्र थांबताना दिसत नाही. शुक्रवारी रात्री चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या एका फास्ट लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारहाणीदरम्यान एक प्रवासी धावत्या लोकलमधून थेट खाली पडल्याची अत्यंत धडकी भरवणारी घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास चर्चगेटवरून सुटलेल्या विरार फास्ट लोकलमध्ये ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान ही घटना घडली. लोकलच्या दरवाजात उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

लोकलचा वेग कमी असल्याने बचावला जीव

वाद विकोपाला गेला असतानाच मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून लोकल जात असताना मारहाणीदरम्यान एक प्रवासी अचानक धावत्या लोकलमधून थेट प्लॅटफॉर्मवर खाली पडला. सुदैवाने, स्थानकात प्रवेश करत असताना लोकलचा वेग कमी होता, त्यामुळे सदर प्रवासी गंभीर अपघातातून थोडक्यात बचावला आणि मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा: Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!

व्हिडिओ व्हायरल, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घटनेदरम्यान डब्यात उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी या संपूर्ण પ્રકારचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि वाढत्या वादाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने अशा हुल्लडबाज प्रवाशांवर कडक कारवाई करावी आणि लोकल डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा वाढवावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास चर्चगेटवरून सुटलेल्या विरार फास्ट लोकलमध्ये ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान घडली.

  • Que: प्रवासी लोकलमधून खाली कसा पडला?

    Ans: लोकलच्या दरवाजात उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीदरम्यान एक प्रवासी धावत्या लोकलमधून खाली कोसळला.

  • Que: तो प्रवासी जिवंत आहे का?

    Ans: होय, सुदैवाने स्थानकात प्रवेश करत असताना लोकलचा वेग कमी असल्याने सदर प्रवासी गंभीर अपघातातून थोडक्यात बचावला आणि त्याचा जीव वाचला.

Web Title: Mumbai local train fight passenger platform grant road mumbai central video viral sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • crime news mumbai
  • Local in Mumbai
  • Local train Mumbai
  • Mumbai News
  • viral video

संबंधित बातम्या

Mumbai News: बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा; नव्या १ बीएचके घरांचा ताबा मिळण्यास सुरुवात
1

Mumbai News: बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा; नव्या १ बीएचके घरांचा ताबा मिळण्यास सुरुवात

Mumbai News: राणीबागेतील पेंग्विन जाणार म्हैसूरला? श्री चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयाच्या मंडळाकडून पेंग्विन कक्षाची पाहणी
2

Mumbai News: राणीबागेतील पेंग्विन जाणार म्हैसूरला? श्री चामराजेंद्र प्राणिसंग्रहालयाच्या मंडळाकडून पेंग्विन कक्षाची पाहणी

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल
3

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल

Milind Deora : फडणवीस – शिंदेंच्या कार्यक्रमाला खासदार मिलिंद देवरांना निमंत्रणच नाही? नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खरमरीत पत्र!
4

Milind Deora : फडणवीस – शिंदेंच्या कार्यक्रमाला खासदार मिलिंद देवरांना निमंत्रणच नाही? नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खरमरीत पत्र!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.