मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण? (फोटो सौजन्य-X)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केल आहेत.
याचदरम्यान सर्वांना जाणून घ्यायचे आहे की, मराठा चळवळीचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत. मनोज पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठा चळवळीसाठी सक्रिय आहेत.
मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे कुटुंब जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे राहत आहे. त्यांचे पालक, तीन भाऊ, पत्नी आणि चार मुलांसह येथे राहतात.
मनोज पाटील यांनी बारावीत शिक्षण सोडले आणि एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या काळात ते मराठा समाजाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले.
गेल्या एक दशकापासून ते मराठा चळवळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यांनी २०१६ आणि २०१८ मध्ये जालन्यात मराठा चळवळीचे नेतृत्व केले.
मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत ३० पेक्षा जास्त आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे.
२०१४ मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व मनोज पाटील यांनीही केले होते. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मनोज यांनी 'शिवबा' नावाची संघटना देखील सुरू केली आहे. २०२१ मध्ये त्यांनी जालन्यातील पिंपळगाव येथे तीन महिने धरणे आंदोलन केले.