Pushkar Jog on the Cannes Red Carpet. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेता पुष्करने त्याच्या @jogpushkar या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही क्षण शेअर केले आहेत. हे फोटो Cannes Film Festival 2026 चे आहे.
मराठी तसेच भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुष्कर Cannes Film Festival 2026 येथे हजर झाला आहे. त्याचा Look पाहून फिरंगी मुलींनाही प्रेमाचे डोहाळे लागले आहेत.
पुष्कर जोगने या कार्यक्रमात Gentleman लुक केला आहे. काळ्या रंगाचा सूट तसेच डोळ्यावर काळा चष्मा असा त्याचा लुक आहे.
अभिनेत्याने कॅप्शनमध्ये "79व्या कॅन्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आणि भारावून टाकणारा ठरला. आंतरराष्ट्रीय मीडिया, फ्रेंच पापाराझी, हॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शक आपल्या आजूबाजूला असताना भारताचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान वाटला." असे नमूद केले आहे.
तर पुढे त्याने लिहले आहे की, "'जय महाराष्ट्र!' ही भावना मनात घेऊन हा क्षण जगलो. देवाचे, आई-बाबांचे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार. Love you Felisha… France TV वर स्वतःला पाहण्याचा आनंद वेगळाच होता. या खास प्रसंगासाठी सुंदर टक्सेडो दिल्याबद्दल @_umangmehta यांचे विशेष आभार."