(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता लवकरच लग्न करणार असून, तिच्या होणाऱ्या अहोंच नाव शंभूराज खुटवड आहे. या दोघांचा लग्नसोहळा आज २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:२४ वाजता संपन्न होणार आहे.
तसेच, अभिनेत्रीची संपूर्ण लग्नाची तयारी झाली आहे. तिने नुकतेच काल संगीत कार्यक्रमामधील आणखी क्षण शेअर केले आहेत. ज्यामध्ये शंभूराज आणि प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहेत.
शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. तसेच शंभूराजने ऑफव्हाईट रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. दोघेही प्रत्येक फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे.
तसेच, संगीत कार्यक्रमामध्ये प्राजक्ता- शंभूराज आणि त्यांचे कुटुंब एकत्र डान्स करताना देखील दिसले आहेत. प्राजक्ताने तिचा आणि शंभूराजचा डान्स करतानाच फोटो देखील शेअर केला आहे.
आता चाहत्यांच्या नजरा प्राजक्ता- शंभूराजच्या लग्नाकडे वळल्या आहेत. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नासाठी अभिनंदन करत आहेत. तसेच आज त्यांचे लग्नाचे फोटो देखील समोर येणार आहेत.