Sonalee Kulkarni Photos
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर भावाच्या लग्नाच्या रिसेप्शननिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सोनालीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. "रिसेप्शन रेडी" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
या आऊटफिटमध्ये सोनालीचा टॉप हा डीप व्ही नेक असून, त्यावर सोनेरी रंगाची अनोखी डिझाइन आहे. अभिनेत्रीच्या टॉपवर असलेल्या डिझाईन्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत.
ओपन हेअर्स आणि लूकला केलेल्या साजेशा मेकअपमुळे सोनालीच्या सौंदर्यात भर पडली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनालीचे सौंदर्य अधिकच उजळून निघाले आहे.
लेहेंग्यावर सोनालीने घातलेले झुमके आणि हातातील बांगड्या यांमुळे सोनालीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.