मराठी तारकांनी रंगला Filmfare, मोठमोठ्या कलाकारांची रेड कार्पेट लागली हजेरी (फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
जयदीप अहलावत यांची देखील या अवॉर्ड कार्यक्रमात हजेरी लागली. राखाडी रंगाचा ब्लेझर आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये हा अभिनेता खूपच सुंदर दिसत होता. या अभिनेत्याने रेड कार्पेटवर कॅमेऱ्यांसमोर पोझ दिली.
या रेड कार्पेट कार्यक्रमात नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील चमकले. अभिनेत्याचा लूक खूपच डॅशिंग होता. तसेच त्यांनी पांढरे शर्ट आणि त्यावर जॅकेट घातले होते.
मराठी आणि हिंदी क्षेत्रात नावाजलेली अभिनेत्री रेणुका शहाणे या देखील फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी राखाडी सिल्वर रंगाची साडी परिधान केली होती.
काळ्या रंगाच्या लेस गाऊनमध्ये प्राजक्ता माळीचा लूक देखील परिपूर्ण दिसला. रेड कार्पेटवर ही अभिनेत्री देखील पोझ देताना दिसली आहे.
सई ताम्हणकरने फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2025 सोहळ्यात तिच्या मनमोहक अदा दाखवताना दिसली. तिने काळ्या रंगाचा लांबलचक गाऊन परिधान केला होता.
अमृता खानविलकरचा रेड कार्पेट लूक देखील पाहण्यासारखा आहे. तिने काळ्या रंगाची साडी नेसली होती ज्याचा ब्लाउस पूर्ण डायमंनने भरलेला होता.
मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठावर नेणारी छाया कदम, चमकदार निळ्या साडी आणि बहुरंगी ब्लाउजमध्ये दिसली. रेड कार्पेटवर या अभिनेत्रीचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
मराठी 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने निळ्या रंगाचा जाळीदार ड्रेस परिधान केला होता.