नवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. देवीची पूजा करुन ठिकाणी दांडिया आणि गरबाचे आयोजन केले जाते. गरब्याला जाताना तरुणी व महिला पारंपरिक पोशाखात चनिया चोलीचा लूक करून सुंदर तयार होतात. त्यामुळे आकर्षक आणि ट्रेंडी ब्लाऊज फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे दांडिया आणि गरबाच्या लुकसाठी या सुंदर मिरर- स्टोन वर्क केलेल्या ब्लाऊजची निवड करु शकता. बाजारात अनेक वेगवेगळ्या आकर्षक आणि ट्रेंडी डिझानचे ब्लाऊज उपलब्ध आहेत. चला तर पाहुयात डिझाईन्स. (फोटो सौजन्य – pinterest)
Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

मिरर वर्क, खडे, कवड्या आणि बहुरंगी धाग्यांची नक्षी असलेले ब्लाऊज नवरात्रीच्या लूकसाठी उत्तम आहेत. पॅचवर्क केलेला ब्लाऊज, प्रिंटेड घागरा, जर्मन सिल्व्हरचे हेवी चोकर, मोठे झुमके आणि हातामध्ये जड पाटल्या घातल्यास लुक सुंदर दिसेल.

लाल, गुलाबी आणि मल्टिकलर कपड्यांवर गोल आणि चौकोनी आरशांचे काम करुन घेतलेला ब्लाऊज कोणत्याही घागऱ्यावर सुंदर दिसेल. स्लीव्ह्जलेस व शॉर्ट स्लीव्ह असलेल्या ब्लाऊजची सगळीकडे मोठी क्रेझ आहे.

बोल्ड लूक करायचा असल्यास हॉल्टर नेक किंवा बारीक स्ट्रॅप असलेले बस्टियर पॅटर्न ब्लाऊजची निवड करावी. गळ्याला व्ही- नेक शेप करुन त्यावर केलेले भरजरी मिरर व बीड्स वर्क लेहेंग्यावर उठावदार दिसेल.

लाल, हिरवा, पिवळा आणि मरून रंगाचे कापड खरेदी करुन त्यावर तुम्ही तुम्हाला हवी तशी डिझाईन आणि वर्क करुन घेऊ शकता. बांधनी किंवा बाटिक प्रिंटच्या पारंपरिक चनिया चोली रॉयल लूक देतात.

राजस्थानी पॅचवर्क असलेल्या ब्लाऊजवर राजपुताना किंवा ट्रेडिशनल हेवी दागिने घातल्यास लुक इतरांपेक्षा हटके दिसेल.






