उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर फणस उपलब्ध होतात. या दिवसांमध्ये आंबा, फणस, जांभुळ इत्यादी फळांना मोठी मागणी असते. फणसाच्या आतील गोड रसाळ गरे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. पोषक घटकांनी समृद्ध असलेला फणस शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो. फणसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक आणि इतर गुणधर्मांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवडीने फणस खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया फणस खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात 'या' लोकांनी आवर्जून करावे फणसाच्या गऱ्यांचे सेवन, जाणून घ्या शरीराला होणारे भरमसाट फायदे

आयुर्वेदानुसार, फणस जड आणि तेलकट भाजी मानली जाते. कच्च्या फणसाचा वापर करून फूस भाजी बनवली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणातील प्रत्येक घरात आवडीने फणस भाजी खाल्ली जाते.

शरीरातील वात संतुलित ठेवण्यासाठी फणस भाजीचे सेवन करावे. ज्या व्यक्तींची पचनशक्ती अतिशय कमजोर आहे अशांनी आहारात फणस भाजीचे सेवन करावे.

मधुमेह असलेल्या लोकांसाठी फणस भाजी अतिशय उत्तम आहे. या भाजीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

वाढत्या कोलेस्ट्रॉपासून सुटका मिळवण्यासाठी फणस भाजी खावी. यामध्ये असलेले पोटॅशियम हृदयविकाराचा धोका कमी करतात. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

बद्धकोष्ठता आणि आतड्यांच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फणस भाजी खावी. यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर फणस भाजी खावी






