भारताच्या दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे यामध्ये तो गणपती बाप्पाला नमन करताना दिसत आहे. यामध्ये त्याने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कपचा कर्णधार सुर्यकुमार यादवने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन गणरायाचे स्वागत केले आहे. त्याने त्याच्या पत्नीसोबत त्याने दोन फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
क्रिकेट देव सचिन तेंडुलकर याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो गणरायाची पुजा करताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या दिनी त्याने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा माजी खेळाडू जहीर खान याने गणेशोत्सवाच्या शुभ दिनी त्याच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. त्याने गणरायाचे स्वागत देखील केले आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी आणि मुलासोबत खास फोटो शेअर केले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया