
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
T20 World Cup 2026 : पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये काल सुपर 8 चा सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाला विजय मिळवून चांगल्या रन रेटने जिंकून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्याची संधी होती. पण श्रीलंकेच्या संघाने सामना गमावला पण सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला जाण्यास देखील त्यांनी रोखले आहे. श्रीलंकेचा संघ त्यांच्याच यजमानपदाखाली झालेल्या टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकला नाही. संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. गेल्या सामन्यात घरच्या प्रेक्षकांसमोर विजय मिळवून निरोप देण्याची संधी होती, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
संघाने या विश्वचषकाची सुरुवात गट टप्प्यात शानदार कामगिरीने केली होती, परंतु सुपर ८ मध्ये संघ चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या या पराभवामुळे श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, संघाचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. तथापि, त्यांनी अद्याप श्रीलंका क्रिकेट बोर्डाला अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही. संघातील त्यांचा कार्यकाळ या वर्षी जूनमध्ये संपत आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर ते मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाले.
🚨 Sanath Jayasuriya has requested to step down as Sri Lanka’s head coach Though his contract runs until June, he has asked to be relieved earlier if a suitable replacement is found#SLvPAK #T20WorldCup2026 pic.twitter.com/Sc0llTKxvd — Cricbuzz (@cricbuzz) February 28, 2026
यावेळी, टी-२० विश्वचषकात श्रीलंकेकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या, कारण संघ घरच्या मालिकेत अपवादात्मक कामगिरी करत होता. विश्वचषकाचे आयोजन करताना, संघाला इतिहास रचण्याची संधी होती, परंतु यश मिळवण्यात अपयश आले. संघाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, ऑस्ट्रेलियाला हरवले, परंतु झिम्बाब्वेकडून पराभव पत्करल्यानंतर, संघ सावरण्यात अपयशी ठरला. सुपर ८ मध्ये, संघाला त्यांच्या तीनपैकी एकही सामना जिंकता आला नाही आणि शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला.
आजचे दोन्ही सामने महत्वाचे असणार आहेत, श्रीलंका आणि पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर झाल्यानंतर आता वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यामध्ये कोणता संघ सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.