PM Narendra Modi celebrate diwali 2025 in goa with Navy soldier at INS Vikrant
यावेळी पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतलाही भेट दिली. जवानांसोबतच्या या खास प्रसंगाची थेट दृश्ये प्रसारित झाली आहेत. पंतप्रधान मोदींनी जवानांना मिठाई भरवली आणि जवानांनी गाणी गाऊन या उत्सवात उत्साह भरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत यंदाची दिवाळी साजरी केली. या दिवाळीला त्यांनी संपूर्ण भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांचे मनोबल वाढवले.
पंतप्रधानांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करताना, “ही दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे. तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं माझं सौभाग्य आहे. माझ्या एकाबाजूला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला माझ्या वीर सैनिकांच सामर्थ्य आहे. समुद्राच्या पाण्यावरील ही सूर्य किरणांची चमक म्हणजे वीर जवानांसाठी दीवाळीचे दिवे आहेतअशी प्रतिक्रिया दिली.
INS विक्रांतवर काल घालवलेल्या रात्रीच शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे. हे जहाज वैगेर आपल्याजागी आहे. पण जी आवड तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे जिवंतपणा त्यात येतो. हे जहाज लोखंडाच आहे, पण तुम्ही जेव्हा त्यामध्ये उतरता तेव्हा त्यात शौर्य उतरतं” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या सैनिकांचे कौतुक केले.
आमच्या तिन्ही सैन्य दलात असलेल्या असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला रेकॉर्ड वेळेत गुडघे टेकायला भाग पाडलं. मी पुन्हा एकदा सशस्त्र पथकाच्या वीर जवानांना सलाम करतो. काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की, विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली. ज्याचं नाव शत्रुच्या साहसाचा शेवट करेल ते म्हणजे INS विक्रांत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आयएनएस विक्रांतचे कौतुक केले.
सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी लिहिले की, तुमच्या सर्वांप्रमाणेच मलाही माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायला आवडते. म्हणूनच मी दरवर्षी या शुभ प्रसंगी आपल्या सैनिकांना आणि सुरक्षा दलांना भेटायला जातो. यावेळी, गोवा आणि कारवारजवळील पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या प्रमुख जहाज आयएनएस विक्रांतवर मला हा बहुमान मिळाला. आपल्या शूर खलाशांसोबत राहण्याची ही संधी मला नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरून गेली आहे, अशी पोस्ट केली आहे.