Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

Strait of Hormuz: "होर्मुझवर आता इराणची दादागिरी चालणार नाही!" ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा दणका; भारताचा तेल पुरवठा सुरक्षित, युद्धाच्या आगीत दिलासादायक बातमी. जाणून घ्या नेमक प्रकरण काय.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 05, 2026 | 09:54 AM
donald trump us navy escort strait of hormuz iran oil threat ends india relief

donald trump us navy escort strait of hormuz iran oil threat ends india relief

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक
  • इराणचे वर्चस्व संपले
  • भारताला मोठा दिलासा

Donald Trump US Navy escort Strait of Hormuz : जागतिक राजकारणात सध्या एकाच नावाचा दबदबा पाहायला मिळतोय – डोनाल्ड ट्रम्प. मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध ( world war 3) आता एका अशा वळणावर आले आहे, जिथून जगाच्या ऊर्जा बाजाराचा चेहरामोहरा बदलणार आहे. इराणने भारतासह जगाला ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद करण्याची धमकी दिली होती, पण आता अमेरिकेने इराणच्या या सर्वात मोठ्या अस्त्रला निकामी करण्याचा प्लॅन तयार केला आहे. व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे की, आता अमेरिकन नौदल थेट समुद्रात उतरून तेल टँकर्सचे रक्षण करेल.

काय आहे ‘होर्मुझ’चे महत्त्व आणि इराणची धमकी?

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची सागरी वाहिनी आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा २० टक्के पुरवठा याच चिंचोळ्या मार्गावरून होतो. भारतासारख्या देशांसाठी, जो ८० टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो, हा मार्ग ‘जीवनवाहिनी’ आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने या मार्गावर नियंत्रण मिळवून तेल पुरवठा रोखण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत भडका उडाला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत आता इराणचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं

अमेरिकन नौदल देणार टँकर्सना सुरक्षा कवच

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकन नौदल आता केवळ गस्त घालणार नाही, तर व्यापारी जहाजे आणि तेल टँकर्ससोबत ‘एस्कॉर्ट’ (Bodyguard) म्हणून चालेल. “जर इराणने सागरी वाहतुकीला अडथळा निर्माण केला, तर अमेरिकन नौदल थेट लष्करी हस्तक्षेप करेल,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे आखाती प्रदेशातून तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या आशियाई देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता भारताच्या जहाजांना इराणच्या धमकावण्याची भीती बाळगण्याची गरज उरणार नाही.

🚨 BREAKING: President Trump announces that effective IMMEDIATELY, the US Navy will escort tankers through the Strait of Hormuz, as Iran threatens to close it “No matter what, the United States will ensure the FREE FLOW of ENERGY to the WORLD. The United States’ ECONOMIC and… pic.twitter.com/qEe08b48eV — Nick Sortor (@nicksortor) March 3, 2026

credit – social media and Twitter

आर्थिक सुरक्षा: विमा आणि स्थिर बाजारपेठ

केवळ लष्करीच नाही तर आर्थिक आघाडीवरही ट्रम्प यांनी इराणला ‘चेकमेट’ दिले आहे. अमेरिकन डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आता आखाती प्रदेशातील जहाजांना ‘राजकीय जोखीम विमा’ (Political Risk Insurance) प्रदान करणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत विमा कंपन्या हात झटकतात, पण अमेरिकेने स्वतः ही जबाबदारी घेतल्याने व्यापारी जहाजांचा प्रवास सुरूच राहील. ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट आणि एनर्जी सेक्रेटरी क्रिस राईट यांची टीम यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्था या धक्क्यातून सावरू शकेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Qatar Warns Iran: ‘आता पाणी डोक्यावरून गेलंय!’ इराणच्या हल्ल्यांनी कतारचा संयम सुटला; आखाती देशांची युद्धात उडी घेण्याची तयारी

इराणचा प्रभाव कायमचा संपणार?

व्हाईट हाऊसच्या मते, इराणवर सुरू असलेल्या ताज्या कारवाईमुळे या प्रदेशातील ऊर्जा सुरक्षा कायमस्वरूपी सुधारेल. आतापर्यंत इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर जगाला ब्लॅकमेल करण्यासाठी करत होता, पण आता तेहरानचा हा प्रभाव अमेरिकेने संपुष्टात आणला आहे. “इराण यापुढे उर्जेचा मुक्त प्रवाह मर्यादित करू शकणार नाही,” असे लेविट यांनी आत्मविश्वासाने म्हटले आहे. सुरुवातीला वाढलेल्या तेलाच्या किमती आता स्थिर होताना दिसत आहेत, जे भारतासाठी महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.

थोडक्यात सांगायचे तर, इराणला चारी बाजूंनी कोंडीत पकडण्याचा ट्रम्प यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास, भारतासह संपूर्ण आशियाला स्वस्त आणि सुरक्षित इंधन मिळत राहील. इराणची ‘होर्मुझ’वरील मक्तेदारी आता इतिहासात जमा होण्याची चिन्हे आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?

    Ans: जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी २० टक्के वहन याच मार्गावरून होते, त्यामुळे हा जागतिक उर्जेचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.

  • Que: 'ऑपरेशन एपिक फ्युरी' म्हणजे काय?

    Ans: इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर करण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेली ही एक लष्करी आणि आर्थिक मोहीम आहे.

  • Que: अमेरिकेच्या या पावलामुळे भारताला काय फायदा होईल?

    Ans: भारताची तेलाची आयात सुरक्षित राहील, इंधनाच्या किमती स्थिर राहतील आणि इराणच्या धमकावण्यामुळे होणारा पुरवठा खंडित होणार नाही.

Web Title: Donald trump us navy escort strait of hormuz iran oil threat ends india relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • iran
  • PM Narendra Modi
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Sharad Pawar Meets PM Narendra Modi: अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे खरे कारण आले समोर; ‘नीट’ पेपरफुटी अन्…
1

Sharad Pawar Meets PM Narendra Modi: अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे खरे कारण आले समोर; ‘नीट’ पेपरफुटी अन्…

RedSeaCrisis :हुतींचा घाव, ब्रेंट ९१ डॉलर पार!
2

RedSeaCrisis :हुतींचा घाव, ब्रेंट ९१ डॉलर पार!

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
3

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
4

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.