Prajakta Mali: प्राजक्ता माळीने गोरेगावमधील घर विकलं? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
प्राजक्ताने गोरेगाव पूर्व येथील आपला 473 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 1.12 कोटी रुपयांना विकला आहे. हा व्यवहार 10 सप्टेंबर 2026 रोजी झाला असल्याचं कागदपत्रांमधून समोर आलं आहे. ही माहिती CRE Matrix या रिअल इस्टेट कंपनीने दिली आहे
ही विक्री चर्चेत येण्याचं कारण म्हणजे प्राजक्ताने नुकतंच म्हणजे 12 ऑगस्ट 2026 रोजी गोरेगावमध्येच एक महागडं अपार्टमेंट घेतलं होतं. त्याची किंमत होती तब्बल 6.42 कोटी रुपये आहे. एक घर घेतलं आणि लगेचच दुसरं विकलं.
प्राजक्ताचं नवीन घर गोरेगावच्या मोहन गोखले रोडवरील ओबेरॉय Exquisite या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहे. ही खूप प्रीमियम सोसायटी आहे. इथे मोठे स्टार्स राहतात. तिच्या या नवीन घराची चर्चा सगळीकडेच सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ताने हे 6.42 कोटींचं घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज पण घेतलं आहे. तिने भारतीय बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं होम लोन घेतल्याचं सांगितलं जातंय. कागदपत्रात याचा उल्लेख आहे.
आता प्रश्न पडतो की जुना फ्लॅट का विकला? तर नवीन मोठं घर घेतल्यावर जुन्या छोट्या घराची गरज राहिली नाही. 473 स्क्वेअर फूटचा फ्लॅट छोटा होता आणि आता तिने मोठं आणि लग्झरी घर घेतलं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून तिने जुना फ्लॅट विकला असावा.
प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतली सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे सिनेमे, तिचे शोज सगळेच गाजतात. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल लोकांना नेहमीच उत्सुकता असते. तिने नवीन घर घेतलं काय किंवा जुनं विकलं काय, त्याची बातमी लगेच व्हायरल होते.
प्राजक्ता कामाबरोबरच प्रॉपर्टीमध्ये पण चांगली इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहे. गोरेगावसारख्या भागात घर घेणं आणि ते पण कोट्यवधी रुपयांचं, यावरून तिची ग्रोथ कळते. मराठी कलाकार पण आता कोट्यवधींचे व्यवहार करत आहेत, हेच यातून दिसतंय.