Raha Kapoor Birthday Photos: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
राहा 4 वर्षांची झाली- आलिया आणि रणबीरची मुलगी राहा 6 नोव्हेंबरला 4 वर्षांची झाली. घरातच छोटासा पण छान वाढदिवस साजरा केला.
आई-बाबांसोबत केक- पहिल्या फोटोमध्ये राहा आई-बाबांसोबत केक कापताना दिसतेय. रणबीरने तिला मांडीवर घेतलंय. पण तिचा चेहरा दाखवला नाही.
आलियाचं प्रेम- एका फोटोमध्ये आलिया राहाला जवळ घेऊन पाप्पी देताना दिसतेय. तिने लिहिलंय, "आमची छोटी युनिकॉर्न 4 वर्षांची झाली."
राहाचा ड्रेस- राहाने राखाडी रंगाचा गुलाबी फुलांचा फ्रॉक घातला होता. केसांना रंगीबेरंगी फुलपाखरू क्लिप्स लावल्या होत्या. ती खूप गोड दिसत होती.
खेळण्यात मग्न- एका फोटोमध्ये राहा चित्र काढताना आणि खेळताना दिसतेय. वाढदिवसाच्या दिवशी तिने खूप मस्ती केली.
आलिया-रणबीरचा लूक- आलियाने क्रीम रंगाचा फुलांचा ड्रेस घातला होता. रणबीर पांढरा टी-शर्ट आणि जीन्समध्ये होता. दोघंही एकदम साधे पण छान दिसत होते.