Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सुरू होणार वाहतूक

Uran Khopta Bridge: जुन्या खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आनंदाची बातमी म्हणजेच दिवाळीत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2026 | 01:21 PM
Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सुरू होणार वाहतूक

Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सुरू होणार वाहतूक

Follow Us
Follow Us:
  • उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात
  • पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणाऱ्या उरणकरांना मोठा दिलासा
  • सध्या पुलावर नवीन लेअरिंग तसेच यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाशी संबंधित काम सुरू
उरण: उरण तालुक्याचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या महत्त्वाच्या जुन्या खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणाऱ्या आणि वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या उरणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Raigad News: दुष्काळातही बंधाऱ्याला झडपा नाहीत! कर्जतमध्ये सरकारच्या पाणी अडवण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थ संतप्त

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतून सन १९९५ मध्ये बांधण्यात आलेला हा पूल उरण तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाच्या संरचनेवर ताण निर्माण झाला होता. पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन करण्यात आलेल्या संरचनात्मक तपासणीत पुलाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे, तसेच बेअरिंग्ज खराब झाल्याचे निदर्शनास आले.

पुलाला नवीन रेलिंग : तंत्रज्ञानाचा वापर

पुलाच्या बांधकामावेळी बसविण्यात आलेल्या जुन्या पद्धतीच्या बेअरिंग्ज बाजारात उपलब्ध नसल्याने त्या नव्याने तयार करून घ्याव्या लागल्या. पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी तडे गेलेल्या भागांवर युव्ह कटिंग करून इपॉक्सी, ग्राउट इपॉक्सी, कार्बन लॅमिनेट आणि फायबर रॅपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, पुलावरील चार सेंट्रल हिज बेअरिंग्ज आणि आत रोलर रॉकर बेअरिंग्ज बदलण्यात आल्या आहेत. सध्या पुलावर नवीन लेअरिंग तसेच यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाशी संबंधित काम सुरू आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन रेलिंगही बसविण्यात आल्या आहेत.

मलेशियन तंत्रज्ञान

या पुलावर सध्या नवीन लेअरिंग तसेच युएचपीसी-एफआरसी चे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी मुंब्रा, पुणे आणि आता खोपटा पुलासाठी हे अत्यंत मजबूत व टिकाऊ कॉक्रिट वापरण्यात आले आहे. हे मलेशियन तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचे असून, त्यामध्ये फायबर आणि सिमेंटचे प्रमाण जास्त असते. काँक्रिटीकरण पक्के करताना तापमानाचे नियंत्रण राखण्यासाठी ते रात्रीच्या वेळी बर्फाच्या साहाय्याने भिजवून तयार करावे लागते. त्यामुळे हे काम रात्रीच्या वेळीच केले गेले असून, एकूण २६८ मीटर लांबीचे कॉक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Intercaste Marriage:  नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…

हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कॉक्रिट सुकल्यानंतर दिवाळीत हा पूल सुरू करण्यात येणार आहे. – दामोदर पाटील, उपाभियता, उरण सार्वजनिक बांधकाम

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khopta bridge repair work nears completion bridge to reopen for traffic during diwali hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Harley-Davidson Sprint 440: बाईकप्रेमींसाठी मोठी खुशखबर! हार्ले-डेव्हिडसनची नवी बाइक लॉन्च, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर
1

Harley-Davidson Sprint 440: बाईकप्रेमींसाठी मोठी खुशखबर! हार्ले-डेव्हिडसनची नवी बाइक लॉन्च, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर

India Auto Industry Sales 2026: वाहन खरेदीचा उत्साह शिगेला! २०२६ मध्ये ऑटो क्षेत्र गाठणार ३.२ कोटी विक्रीचा टप्पा?
2

India Auto Industry Sales 2026: वाहन खरेदीचा उत्साह शिगेला! २०२६ मध्ये ऑटो क्षेत्र गाठणार ३.२ कोटी विक्रीचा टप्पा?

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक
3

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक

Mumbai News: बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा; नव्या १ बीएचके घरांचा ताबा मिळण्यास सुरुवात
4

Mumbai News: बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा; नव्या १ बीएचके घरांचा ताबा मिळण्यास सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.