महाराष्ट्राचे लाडके नेता असणाऱ्या राज ठाकरे यांनीही आपल्या घरी शिवतिर्थावर रक्षाबंधनाचा हा सण उत्साहात साजरा केला आहे
बहीण जयवंती देशपांडे आणि हेतल शाह यांच्याकडून राज ठाकरे यांनी राखी बांधून घेतली आणि हा सण साजरा केला
राज ठाकरे यांच्या बहिणीने त्यांना औक्षण करून राखी बांधली आणि त्यांच्या हा खास क्षणाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत
नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनीदेखील राज ठाकरे यांना या क्षणी ओवाळून राखी बांधलेली दिसून येत आहे
या कौटुंबिक सोहळ्याचे हे आनंदी क्षण सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे
रक्षाबंधनाचा हा खास दिवस आपल्या बहिणींबरोबर राज ठाकरे यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केल्याचे पहायला मिळाले