Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

Raj Thackeray on UPI : UPIच्या नव्या MDR नियमावर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. ‘दारावरची टकटक’ म्हणत त्यांनी हा निर्णय म्हणजे भारतीयांना डिजिटल सापळ्यात अडकवण्याचा प्रकार असल्याची टीका केली.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 04:57 PM
युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

Follow Us
Follow Us:
  • 15 ऑक्टोबरपासून ₹2,000 पेक्षा जास्त पात्र P2M UPI व्यवहारांवर 0.4% MDR लागू होणार
  • या निर्णयावर राज ठाकरे यांनी ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
  • अर्थ मंत्रालयाचा स्क्रिनशॉट शेअर करत सरकारच्या दुटप्पीपणावर भाष्य
 

Raj Thackeray on UPI : UPI च्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या व्यापारी व्यवहारांवर MDR लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘दारावरची टकटक!’ असं म्हणत त्यांनी या निर्णयावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

नव्या नियमांनुसार, 15 ऑक्टोबर 2026 पासून ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र Person-to-Merchant म्हणजेच P2M UPI व्यवहारांवर 0.4 टक्के MDR आकारला जाणार आहे. हा शुल्क व्यापाऱ्यांकडून आकारला जाणार आहे. ₹75 हजार किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहारांसाठी MDRची कमाल मर्यादा ₹300 ठेवण्यात आली आहे. मात्र, Person-to-Person म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारे UPI व्यवहार यापुढेही मोफत राहणार आहेत.

याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आधी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी UPIची सवय लावली आणि आता त्याच व्यवस्थेवर शुल्क आणलं जात असल्याची टीका त्यांनी केली.

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

काय म्हणाले राज ठाकरे ?

यूपीआय व्यवहारावरील या निर्णयाला राज ठाकरे यांनी ‘दारावरची टकटक’ म्हणत सरकारला धारेवर धरले आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत म्हणाले, “केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, ‘डिजिटल सापळा’ लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच ‘डिजिटल सापळ्यात’ पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.”

“सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दारावरची टकटक ! केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, ‘डिजिटल सापळा’ लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना… pic.twitter.com/nLH8nTFukL — Raj Thackeray (@RajThackeray) September 19, 2026

शक्य असत तर अर्थमंत्री बाईंनी श्वासोच्छवासावर पण १८% जीएसटी लावला असता…

ते पुढे म्हणाले, “ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४% एमडीआर लागू होणार ? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत ? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का ? उत्तर आहे अजिबात ‘नाही’.”

“पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८% जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन युपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का ?”

हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं असा काँग्रेसचा आरोप

ते पुढे म्हणाले “काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला.”

“प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. UPI चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं. आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे.”

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

अर्थ मंत्रालयाचा स्क्रिनशॉट शेअर करत सरकारच्या दुटप्पीपणावर भाष्य

यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा, असे आवाहनदेखील राज ठाकरे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी २१ ऑगस्ट २०२२ रोजी अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरचा स्क्रिनशॉट देखील जोडला आहे. ज्यात सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही असं घोषित केलं असल्याचं दिसत आहे.

त्यामुळे आता UPIच्या MDRवरून व्यापारी, ग्राहक आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकार UPI व्यवस्था आर्थिकदृष्ट्या टिकाऊ करण्याचा मुद्दा मांडत आहे, तर दुसरीकडे विरोधक आणि काही व्यापारी संघटना या शुल्कामुळे डिजिटल व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

Web Title: Raj thackeray on upi mdr charges digital trap centre government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Central government
  • raj thackeray
  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!
1

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!

Raj Thackeray :  ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला
2

Raj Thackeray : ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला

सांगता काय? UPI Transactions वर डबल दणका… 2000 पेक्षा जास्तच्या MDR वर लागू होणार 18 % GST
3

सांगता काय? UPI Transactions वर डबल दणका… 2000 पेक्षा जास्तच्या MDR वर लागू होणार 18 % GST

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.