सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत
अंजीरमध्ये भरपूर फायबर आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित भिजवलेले एक अंजीर आणि त्याचे पाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस, अपचनाची समस्या कमी होते.
वय वाढल्यानंतर हाडांसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. त्यामुळे हाडे दीर्घकाळ मजबूत राहण्यासाठी अंजीर खावे. अंजीरचे पाणी प्यायल्यामुळे हाडांमधील लवचिकता कायम टिकून राहते.
वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण अंजीरचे पाणी नियमित महिनाभर प्यायल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अंजीरच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊन जातो.
मधुमेह झाल्यानंतर गोड पदार्थांचे जास्त सेवन करू नये. त्यामुळे नैसर्गिक गोडवा असलेले अंजीर तुम्ही खाऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.