सई ताम्हणकरचा ब्लॅक अँड व्हाईट साडीतील हा लुक सध्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करताना दिसतोय. सोशल मीडियावर या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे
प्रिंटेड सिल्क ऑफव्हाईट साडीवर सईने फुल स्लीव्ह्ज ब्लॅक ब्लाऊज परिधान केलाय आणि अगदी जुन्या हिरॉईनच्या लुकचा फील आणलाय
सईने छानशी हेअरस्टाईल करत रेट्रो लुकसाठी केसांना मोठा ब्लॅक बेल्ट लावला आहे आणि केसांना मधून भांग पाडत आपल्या क्लासी लुकने चाहत्यांवर सौंदर्याचा कटाक्ष टाकलाय
मिनिलम मेकअप फाऊंडेशन, कन्सिलर, मस्कारा, आयलायनर, काजळ लावले आहे आणि अत्यंत मिनिमल लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय. तर तिच्या ब्राऊन डोळ्यांमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे
या साडीसह ऑफव्हाईट रंगाची पोटली बॅग सईने हातात घेतली आहे आणि त्यामुळे तिचा लुक अधिक स्टायलिश झाल्याचे दिसून आले
या साडीसह सईने कानात गोल्डन मोठे टॉप्स आणि गळ्यात स्टायलिश चैन घातली आहे. ब्लॅक अँड व्हाईट साडीसह तिची हे मिनिमल ज्वेलरी परफेक्ट मॅच करतेय