महागड्या मेकअपला रामराम! फक 40 रुपयांत घरच्या घरी बनवा नॅचरल Blush
हिवाळ्यात गालांवर गुलाबी चमक फार आकर्षक आणि सुंदर वाटते. बाजारातून केमिकल-बेस्ड ब्लश खरेदी करण्याऐवजी, तुम्ही ते घरीच बनवू शकता.
घरगुती ब्लश त्वचेला सुरक्षित ठेवते आणि नैसर्गिक पद्धतीने सुंदरताही मिळवून देते.
घरच्या घरी ब्लश बनवण्यासाठी एक चमचा बीटरूट पावडरमध्ये २-३ थेंब गुलाबजल मिसळा आणि एक पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट हलक्या बोटांनी गालावर लावा आणि नैसर्गिक गुलाबी चमक मिळवा. कोणतेही रासायनिक घटक यात नसल्याने या ब्लशचा आपल्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
घरी तयार केलेले हे ब्लश तुम्ही एका लहान हवाबंद डब्यात साठवू शकता. हे ब्लश गालांसह ओठांवरही वापरता येईल.