Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meghna Erande Joshi: सनई चौघडे’च्या पमा परबची पडद्यामागची दिवाळी; मेघना एरंडे जोशींनी सांगितले फराळाचे किस्से

Meghna Erande Joshi : सनई चौघडे’ मालिकेतील पमा म्हणजेच अभिनेत्री मेघना एरंडे जोशी यांनी बालपणीची शिवाजी पार्कमधील दिवाळी, आईच्या हातचा फराळ, भाच्यासोबत कंदील बनवण्याच्या आठवणी आणि जोशी कुटुंबाची दिवाळीची परंपरा सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 30, 2026 | 12:54 PM
( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Meghna Erande Joshi : दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दिवाळी म्हटलं की घरभर दरवळणारा फराळाचा सुगंध, रंगीबेरंगी रांगोळी, आकाशकंदील, नवीन कपड्यांची खरेदी आणि कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण डोळ्यांसमोर येतात. प्रत्येकाच्या मनात या सणाच्या काही खास आठवणी असतात. झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत पमा परबची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेघना एरंडे जोशी यांच्यासाठीही दिवाळी हा आनंद, परंपरा आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा सण आहे. लहानपणी शिवाजी पार्कमध्ये आई-वडिलांसोबत साजरी केलेली दिवाळी, भाच्यासोबत कंदील बनवण्याचा अनुभव, आईच्या हातचा फराळ आणि सासरच्या मंडळींनी जपलेली दिवाळीची परंपरा अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

शिवाजी पार्कमधील दिवाळीच्या आठवणी

मेघना सांगतात की, लहानपणी त्यांची दिवाळी शिवाजी पार्कमध्ये आई-वडिलांसोबत साजरी व्हायची. दिवाळीच्या सुट्टीत मिळणारा अभ्यास, त्यासाठी तयार करावी लागणारी स्वतंत्र वही आणि ती सजवण्याची मजा, अशा अनेक गोष्टी त्यांच्या आठवणीत आहेत. त्यांची आई फराळाचे पदार्थ बनवायची, तर बहीण रांगोळी काढायची आणि मेघना तिला रंग भरण्यासाठी मदत करायच्या. वडील त्यांच्यासाठी थोडेसे फटाके आणायचे.

मात्र, लहानपणी एका डॉक्युमेंटरीसाठी फटाक्यांचा कारखाना पाहिल्यानंतर त्यांचा फटाक्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. फटाके बनवणाऱ्या लहान मुलांना सहन करावा लागणारा त्रास आणि रसायनांमुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहून त्यांनी फटाके न उडवण्याचा निर्णय घेतला. आजही त्या शक्यतो फटाक्यांपासून दूर राहतात. मुलगी इला हिला फटाक्यांचा अनुभव मिळावा म्हणून पती विक्रम यांनी छोटे भुईचक्र किंवा अनार आणण्याचा विचार सांगितला होता; मात्र मोठे आवाज करणारे फटाके टाळण्यावर त्यांचा भर असतो.

भाच्यासोबत कंदील बनवण्याचा आनंद

मेघना यांच्या दिवाळीच्या आठवणींमध्ये त्यांचा भाचा निहार याचाही खास वाटा आहे. निहारला सुंदर कंदील बनवता येतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून तो त्यांच्यासाठी कंदील तयार करून देतो. पुण्यात राहणारा निहार मित्रांसोबत किल्लाही बनवायचा. त्याने तयार केलेले कंदील आणि किल्ले पाहण्याचा आनंद मेघना यांनी अनुभवला आहे. कधी कधी त्या स्वतःही त्याला मदत करायच्या. दिवाळीच्या निमित्ताने एकत्र भेटून कंदील आणि किल्ले बनवण्याच्या या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत.

आईच्या हातचा फराळ म्हणजे दिवाळीचा खरा सुगंध

मेघना यांना फराळाचे पदार्थ खूप आवडतात. चकली, आईच्या हातचा चिवडा, लाडू, शंकरपाळ्या, शेव आणि अनारसे असे अनेक पदार्थ त्यांच्या आवडीचे आहेत. फराळ बनवताना घरभर दरवळणारा सुगंध म्हणजे दिवाळी सुरू झाल्याची जाणीव, असं त्या सांगतात. त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात फराळ बनवला जातो आणि नातेवाईकांमध्ये त्याची देवाणघेवाणही केली जाते.

दादरमध्ये दिवाळी सुरू होण्याआधीच सणाचं वातावरण तयार व्हायचं. बाजारपेठेतील झगमगाट, शॉपिंगची लगबग, मोठमोठे कंदील आणि मॅचिंग कपड्यांची खरेदी या सगळ्या गोष्टी त्यांना आवडायच्या. चपलेपासून टिकली, बांगड्या आणि कानातल्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट मॅचिंग घेण्याचा उत्साह असायचा, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

जोशी कुटुंबातील दिवाळीची खास परंपरा

जवळपास २८ ते २९ वर्षे मेघना यांनी दिवाळी आई-वडिलांसोबत साजरी केली. त्यानंतर गेली १६ वर्षे त्या पती विक्रम यांच्या जोशी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतात. त्यांच्या सासूबाईंनी एक सुंदर परंपरा जपली आहे. कुटुंबातील प्रत्येक नातेवाईकाच्या घरी दिवाळीचा एक दिवस साजरा करायचा, असं ठरलेलं असतं. लक्ष्मीपूजन जोशी कुटुंबाच्या घरी होतं, तर इतर दिवशी सगळे नातेवाईक एकमेकांकडे जेवायला जातात. त्यामुळे प्रत्येकाची भेट होते आणि सणाचा आनंद सगळ्यांसोबत घेता येतो.

पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी यांमध्ये बदल जाणवत असल्याचंही मेघना सांगतात. पूर्वी पहाटे आई सनई लावायची, उटणं लावून अभ्यंगस्नान व्हायचं, फराळ खाल्ला जायचा आणि नातेवाईकांकडे जाण्याची लगबग असायची. घराघरांत पारंपरिक पद्धतीने फराळ बनवला जायचा आणि बिल्डिंगमधील अनेक घरांमध्ये एकसारखे कंदील किंवा रोषणाई असायची. आता प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार दिवाळी साजरी करतो. त्यामुळे सणाचं स्वरूप बदललं असलं, तरी त्याचा आनंद कायम असल्याचं त्या म्हणतात.

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवा प्रोमो!

घरी फराळ बनवण्यापेक्षा चव तपासण्याची जबाबदारी!

मेघना यांच्या घरी आई आणि सासूबाई दोघीही उत्तम स्वयंपाक करतात. त्यामुळे फराळाचे बहुतेक पदार्थ त्याच बनवतात. मेघना यांच्याकडे मात्र चव पाहण्याची आणि पदार्थांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी असते. मागील दिवाळीत आपण चांगल्या करंज्या करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे यंदा फराळ बनवण्याच्या कामात आणखी काही मदत होईल, अशी शक्यता आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेतही पमाच्या घरी फराळाची लगबग

‘सनई चौघडे’ मालिकेत पमा परबचा फराळाच्या व्यवसायाशी संबंध असल्यामुळे तिच्या घरी चकल्या, चिवडा आणि लाडू बनवण्याची लगबग सुरू असते. पमाचं लग्न ठरलं होतं, तेव्हाही तिनेच स्वयंपाक आणि फराळ बनवला होता. मालिकेत मेघना यांनी चकल्या तळण्याचाही अनुभव घेतला. मोठ्या भांड्यातील उकळतं तेल पाहून त्यांना सुरुवातीला भीती वाटली होती; मात्र दिग्दर्शक राजू सरांनी धीर दिल्यानंतर त्यांनी तो शॉट पूर्ण केला. मालिकेसाठी सेटवर १० ते १२ किलो चिवडाही बनवण्यात आला होता. पमाच्या भूमिकेमुळे फराळ बनवण्याचा अनुभव मिळत असल्याचं मेघना सांगतात.

‘दिवाळी हा पाचही इंद्रियांना सुखावणारा सण’

मेघना यांना दिवाळी घरच्यांसोबत, छान नटून-थटून आणि निवांतपणे साजरी करायला आवडते. त्यांच्या मते, दिवाळी हा असा सण आहे जो पाचही इंद्रियांना आनंद देतो. फराळाचा सुगंध, रांगोळीला स्पर्श करण्याचा आनंद, दिवाळीच्या गाण्यांचे आवाज, डोळ्यांना सुखावणारी रोषणाई आणि सणाच्या वातावरणातील उत्साह या सगळ्यांमुळे दिवाळीचा अनुभव खास बनतो. याआधी त्यांनी अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या कलाकारांसोबत दिवाळी पहाटचे कार्यक्रमही होस्ट केले आहेत.

मेघना एरंडे जोशी यांच्या या आठवणींमधून बालपणीचा उत्साह, फराळाची आवड, कुटुंबाने जपलेल्या परंपरा आणि नात्यांमधला जिव्हाळा दिसून येतो. काळानुसार दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी आपल्या माणसांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याचं महत्त्व आजही कायम आहे.

Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

Web Title: Meghna erande joshi shared diwali memories ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Natya Parishad Karandak 2026: ‘पाकिस्तानचं यान’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका; ‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धेचा निकाल जाहीर
1

Natya Parishad Karandak 2026: ‘पाकिस्तानचं यान’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका; ‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धेचा निकाल जाहीर

Eetha Movie: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये विठाबाईंच्या नवऱ्याची भूमिका साकारणार ‘हा’ बॉलिवूड अभिनेता, ‘मर्चंट’चा फर्स्ट लूक समोर
2

Eetha Movie: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये विठाबाईंच्या नवऱ्याची भूमिका साकारणार ‘हा’ बॉलिवूड अभिनेता, ‘मर्चंट’चा फर्स्ट लूक समोर

Aamir Khan -Gauri Karwa Chauth: वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानचं पहिलं करवा चौथ! तिसऱ्या लग्नानंतर गौरीसोबत केलं खास सेलिब्रेशन
3

Aamir Khan -Gauri Karwa Chauth: वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानचं पहिलं करवा चौथ! तिसऱ्या लग्नानंतर गौरीसोबत केलं खास सेलिब्रेशन

Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा
4

Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.