यंदाच्या दिवाळीत आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी खरेदी करा 'या' डिझाईनच्या मोरपंखी साड्या
सणावाराच्या दिवशी सगळ्यांचं पारंपरिक आणि मराठमोळा लुक करायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे तुम्ही मोरपंखी रंगाची पैठणी साडी खरेदी करू शकता. मोरपंखी रंगाच्या पैठणी साडीवर आरी वर्क केलेले ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल.
मोरपंखी रंग निळ्या आणि हिरव्या रंगाचे मिश्रण आहे. त्यामुळे या रंगाच्या साडीवर दोन छटा दिसून येतात. चंदेरी धाग्यांचा वापर करून तयार केलेली बनारसी साडी तुम्ही दिवाळीनिमित्त खरेदी करू शकता.
मोरपंखी रंगात अनेक वेगवेगळ्या डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. सोन्याची जर घालून विणलेली साडी कोणत्याही सणांसाठी उत्तम पर्याय आहे.
मोरपंखी रंगात तुम्ही कांजीवरम सिल्क साडीसुद्धा खरेदी करू शकता. कांजीवरम साडी नेसल्यानंतर त्यावर सोन्याचे दागिने परिधान केल्यास लुक पारंपरिक दिसेल.
मोरपंखी रंगाच्या साडीवर पोपट, मोर, कुहिरी, कमळाच्या डिजाईन्स असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.