Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Food: दिवाळीत तळलेलं खाल्ल्यामुळे पोटात गॅस आणि Acidity चा त्रास होतोय का, जाणून घ्या सोपे उपाय

Diwali Food: दिवाळीत जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाला बऱ्याच जणांना त्रास होतो. गॅस होणं, पोट फुगणं आणि अपचन यासारख्या समस्यांवर काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 11, 2026 | 02:22 PM
दिवाळीच्या फराळाने त्रास झाल्यास घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

दिवाळीच्या फराळाने त्रास झाल्यास घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी फराळामुळे आरोग्यावर होणारा परिणाम
  • पोटातील गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास 
  • दिवाळी फराळ खाल्ल्यानंतर घरगुती उपाय काय करावे 
Diwali Food: दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही, तर खाण्यापिण्यानेही भरलेला असतो. या सणासाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. मिठाई, स्नॅक्स, कचोऱ्या, समोसे आणि तळलेले पदार्थ हे दिवाळीच्या पार्ट्यांचे मुख्य आकर्षण असते. आपण कितीही प्रयत्न केला तरी, आपण स्वतःला रोखू शकत नाही. पण याच तळलेल्या पदार्थांमुळे पोटात गॅस, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणं असे परिणाम दिसू लागतात. 

सणाच्या उत्साहात आपण अनेकदा मनसोक्त तळलेले पदार्थ खातो, पण हे पोटासाठी त्रासदायक ठरू शकते. जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. जर तुम्हालाही जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर काही घरगुती उपाय आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी काही घरगुती उपाय आपल्या आई-आजीकडूनही सांगण्यात येतात, आपण आज लेखातून हेच जाणून घेऊया. 

ओवा आणि काळे मीठ 

ओवा आणि काळे मीठ हे पोटातील गॅस आणि जडपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहेत. जास्त खाल्ल्यामुळे तुमचे पोट जड वाटत असल्यास, एक चमचा ओवा थोड्या काळ्या मिठात मिसळा, ते चांगले चावून खा आणि नंतर कोमट पाण्यासोबत प्या. ओवा पचनास मदत करतो आणि पोटातील जडपणा कमी करून गॅसपासून आराम देतो.

Post Meal Acidity: जेवल्यानंतर छातीत जळजळ होते? मग ‘हे’ घरगुती उपाय त्वरित मिळवून देतील आराम, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका

आलं आणि लिंबाचा रस 

जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात गॅस किंवा सूज आली असल्यास, आले आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन त्याचा रस काढा. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ किंवा सैंधव मीठ घाला. ते चाटल्याने पोटातील जळजळ शांत होऊ शकते आणि मळमळ किंवा जडपणापासून आराम मिळू शकतो.

हिंग आणि जिरे

जिरं आणि हिंग दोन्ही पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. जिऱ्यामुळे मेटाबॉलिझम वाढते, तर हिंग गॅस बाहेर टाकण्यास मदत करतो. एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालून चांगले उकळा आणि थोडे थंड झाल्यावर प्या. यामुळे अपचन आणि गॅसपासून आराम मिळेल.

खडीसाखरेसह बडिशेप

याशिवाय बडीशेप आणि खडीसाखर पचनक्रिया सुधारतात. बडीशेप आणि खडीसाखरेचा थंडावा देणारा गुणधर्म आहे. त्यांचे सेवन केल्याने छातीत होणारी जळजळ कमी होते आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो. तुम्ही एक चमचा बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाऊ शकता, किंवा बडीशेप पाण्यात मिसळून त्याचा काढा बनवून पिऊ शकता.

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

ताक आणि जिऱ्याची पूड 

तसंच जर तुम्ही भरपूर तळलेले पदार्थ खाल्ले असतील आणि पोटात जळजळ होत असेल, तर पोटाला आराम देण्यासाठी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड ताकात मिसळून प्या. ताक पोटाला थंडावा देते आणि अपचनापासूनही आराम देते. हे घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळलेल्या पदार्थांनी काय होते

    Ans: तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्यास पोटात गॅस आणि अपचनाचा त्रास होतो

  • Que: यावर घरगुती उपाय आहेत का?

    Ans: गॅस आणि अपचनावर अनेक घरगुती उपाय आहेत

  • Que: अपचनासाठी लगेच डॉक्टरांची भेट घ्यावी का?

    Ans: सतत उलट्या, ताप वा जुलाब होत असतील तर मात्र डॉक्टरांची भेट घेणे गरजेचे आहे

Web Title: Diwali food effect on stomach gas acidity home remedies dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • acidity
  • Diwali 2026
  • Diwali food
  • gas home remedies

संबंधित बातम्या

Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला ओवाळण्याची योग्य वेळ कोणती? वाचा पंचांग माहिती, पूजा विधी, धार्मिक महत्त्व, आणि परंपरा…
1

Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला ओवाळण्याची योग्य वेळ कोणती? वाचा पंचांग माहिती, पूजा विधी, धार्मिक महत्त्व, आणि परंपरा…

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल
2

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
3

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित
4

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.