हातांच्या मनगटांमध्ये शोभून दिसतील 'या' सुंदर डिझाईन्सच्या चांदीच्या बांगड्या
चांदीच्या बांगड्या बनवताना तुम्ही कोणत्याही गोलाकार किंवा चौकोनी आकारात सुद्धा बांगड्या बनवून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही सुंदर फुलांची किंवा बारीक नक्षीकाम केलेली डिझाईन बनवू शकता.
टेम्पल डिझाइन्समधील दागिने अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. कोणतीही सिल्क किंवा कॉटनची साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही चांदीची बांगडी किंवा कडा परिधान करू शकता.
काचेच्या बारीक खड्यांचा वापर करून बनवलेल्या बांगड्या तुम्ही कोणत्याही सणावाराच्या दिवसांमध्ये हातात घालू शकता.
कोरीवकाम किंवा जाळीचे काम करून बनवलेल्या बांगड्या हातामध्ये अतिशय सुंदर दिसतात. वजनाने हलक्या असल्या तरीसुद्धा खूप स्टयलिश आणि सुंदर लुक देतात.
काहींना रंगीत स्टोनचा वापर करून बनवलेल्या बांगड्या घालायला खूप आवडतात. या बांगड्या साडी किंवा डिझायनर ड्रेसवर आकर्षक दिसतात.