Xiaomi 15 ला टक्कर देणार हे 5 तगडे स्मार्टफोन्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून ठरवा तुमच्यासाठी कोणता बेस्ट
Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra ची OnePlus 13, Samsung Galaxy S25, Vivo X200, iQOO 13 5G आणि OPPO Find X8 या स्मार्टफोनसोबत टक्कर होण्याची दाट होण्याची शक्यता आहे.
OnePlus 13 स्मार्टफोन 6.82 -इंचाचा QHD डिस्प्ले आणि एडजस्टेबल "रेडियंट व्ह्यू" सिस्टमसह येतो. यात Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. यात 50 MP + 50 MP + 50 MP ट्राय कॅमेरा सेटअप आणि 6,000 mAh बॅटरी आहे. स्मार्टफोन Amazon वरून 76,998 रुपयांना खरेदी करता येईल.
Samsung Galaxy S25 मध्ये 6.2-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर देखील आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 10 मेगापिक्सेल 3x टेलिफोटो लेन्स आणि मागील बाजूस 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo X200 फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात मागील बाजूस 50 MP + 50 MP + 50 MP ट्राय कॅमेरा सेटअप आणि समोर 32 MP लेन्स आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 ने सुसज्ज असलेला हा फोन 5800mAh बॅटरीसह येतो. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून 65,999 रुपयांना खरेदी करता येईल.
iQOO 13 5G फोनमध्ये 6.82 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. यात Qualcomm चा Snapdragon 8 Elite प्रोसेसर देखील आहे, जो उत्तम कामगिरी देतो. यात मागील बाजूस 50 MP + 50 MP + 50 MP ट्रियो कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी यात 32 MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 6000 mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Amazon वरून 54,998 रुपयांना खरेदी करता येईल.
OPPO Find X8 मध्ये 6.59 इंचाची LTPO AMOLED स्क्रीन आहे. त्याच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, ते मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यात 50 MP + 50 MP + 50 MP रियर कॅमेरे आणि 32 MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. त्याची बॅटरी क्षमता 5630 mAh आहे. Amazon वर हा स्मार्टफोन 69,999 रुपयांना उपलब्ध आहे.