सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे फोटो शूट सोशल मीडियावर फारच चर्चेत असते. सध्या अप्सराचा साडीतील लुक चाहत्यांना घायाळ करत आहे.
तिच्या आगामी चित्रपट, टेलिव्हिजन शो, मालिका इत्यादींसह तिच्या रोजच्या जीवनातील अपडेट्स ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
सोनाली कुलकर्णीचे नवे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने ती या फोटोमध्ये गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
या साडीत सोनाली जणू अप्सराच दिसत आहे. सोनाली डान्स महाराष्ट्र डान्स या रिऍलिटी शो ची परीक्षक आहे.
नेहमी प्रमाणे सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईकचा पाऊस पाडला आहे.सोनालीचे इंस्टाग्रामवर तब्बल १. ९ मिलियन फॉलोअर्स आहेत.