लग्न समारंभातील साड्यांवर शिवा 'या' डिझाईनचे ब्लाऊज
ब्लाऊजच्या मागील गळ्याला तुम्ही या पद्धतीने डिझाईन सुद्धा करू शकता. याशिवाय फुलांच्या पाकळ्यांमध्ये केलेली डिझाईन खूप जास्त उठावदार दिसते.
काहींना खूप जास्त सिंपल ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतात. मटका गळ्याचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर शोभून दिसते.
ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याला तुम्ही अंडाकृती कट देऊन ब्लाऊज शिवून घेऊ शकता. अंडाकृती कट असलेल्या ब्लाऊजवर बारीक मण्यांची लेस अतिशय सुंदर दिसते.
कॉटनच्या साडीवर बोट नेक ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. अनेकांना बंद गळ्याचे ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतात. याशिवाय तुम्ही ब्लाऊजवर नाजूक मणी लावून सुंदर ब्लाऊज स्टाईल करू शकता.
काठपदर किंवा पैठणी साडी खरेदी केल्यानंतर त्यावर तुम्ही व्ही शेप असलेला ब्लाऊज शिवून घेऊ शकता. व्ही शेप ब्लाऊजवर आरी वर्क सुद्धा सुंदर दिसते.