हळदीमध्ये दिसेल स्टयलिश लुक!
पिवळ्या आणि डार्क गुलाबी रंगाचा लेहेंगा हळदी समारंभासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचा लुक काहीसा ट्रेडिशनल आणि स्टायलिश सुद्धा दिसेल.
इतरांपेक्षा तुम्हाला जर हटके आणि सुंदर हवा असेल तर तुम्ही हळदी समारंभात नारंगी रंगाचे कपडे परिधान करू शकता. नारंगी रंग तुमच्यावर उठावदार दिसेल.
हळदी समारंभामध्ये लाईट ब्लु रंगाचे कपडे अतिशय सुंदर दिसतील. बाजारात लाईट ब्लु रंगाचे कस्टमाईज लेहेंगे आणि साड्या देखील उपलब्ध आहेत.
लव्हेंडर रंगाचे सगळेच शेड्स कोणत्याही रंगावर अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतात. लव्हेंडर रंगाच्या लेहेंग्यामध्ये तुम्ही खूप जास्त स्टयलिश आणि हटके लुक दिसेल.
हळदीमध्ये पिवळ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या साडीवर आकर्षक पिवळ्या रंगाची मोठी सूर्यफूल असलेली साडी किंवा लेहेंगा अतिशय सुंदर दिसेल.