गाली से ताली तक का सफर-‘ताली’ वेबसीरीजचा टीझर रिलीज
सुष्मिता सेनची (Sushmita Sen) नवीन वेबसीरीज ‘ताली’(Taali Web Series) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेबसारिज आहे. ‘ताली’ या वेबसीरीजचा ऑफिशल टीझर (Taali Teaser) नुकताच रिलीज झाला आहे. ‘गाली से ताली तक के सफर की कहानी’ असं म्हणत हा टीझर रिलीज करण्यात आलाय. ‘ताली’ ही वेबसीरिज 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. ही वेबसीरीज जिओ सिनेमावर (Jio Cinema) फ्रीमध्ये पाहता येणार आहे.