Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Aadi Anant Marathi Movie: अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आदि अनंत’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड सुरू आहे. पहिल्या आठवड्यात २.१६ कोटींची कमाई, तर महाराष्ट्रात १.२५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा सुरू असतानाही मराठी चित्रपटांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाने तब्बल २.१६ कोटी रुपयांची कमाई केली असून, महाराष्ट्रात १ लाख २५ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता चित्रपटाच्या शोमध्येही वाढ करण्यात आली आहे.
दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी वाटचाल

विशेष म्हणजे, सध्या पाच मराठी चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर स्पर्धा सुरू असतानाही ‘आदि अनंत’ने दुसऱ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील सुमारे २०० चित्रपटगृहांमध्ये २५० हून अधिक शोसह चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आजोबा-नातवाच्या नात्याची भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस

‘आदि अनंत’मध्ये आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावनिक बंध प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. या नात्यातील मतभेद, संवाद, प्रेम आणि एकमेकांबद्दल असलेली ओढ यांची हृदयस्पर्शी कथा चित्रपटातून उलगडते. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयातील सहजता, दोघांमधील सुंदर केमिस्ट्री आणि

भावनिक प्रसंगांची मांडणी प्रेक्षकांना विशेष भावत आहे.

केवळ मनोरंजन न करता नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे. त्यामुळेच चित्रपटाला पहिल्या आठवड्यापासून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक महेश लिमये काय म्हणाले?

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक महेश लिमये म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘आदि अनंत’ला दिलेला प्रतिसाद मनापासून आनंद देणारा आहे. नात्यांमधील भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि ते चित्रपटाशी जोडले जात आहेत, हीच आमच्यासाठी मोठी पावती आहे.”

निर्माते समीर हंपी यांनीही पहिल्या आठवड्यातील यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “पहिल्या आठवड्यात मिळालेलं हे यश आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाची घोडदौड सुरू असून दुसऱ्या आठवड्यातही २०० चित्रपटगृहांत आणि २५० हून अधिक शोसह चित्रपट प्रदर्शित होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम असेच कायम राहील, अशी आशा आहे.”

निर्माते मुरलीधर छतवानी म्हणाले, “मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच प्रोत्साहन देणारा असतो. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून समाधान वाटते. पहिल्या आठवड्यातील यश आणि दुसऱ्या आठवड्यातही मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास आहे.”

DPIFF Awards 2026: ‘धुरंधर’चा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात डंका! रणवीर सिंह, अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा गौरव

कोणाची आहे निर्मिती आणि दिग्दर्शन?

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले असून, कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.

पहिल्या आठवड्यातील दमदार कमाईनंतर दुसऱ्या आठवड्यातही ‘आदि अनंत’ची घोडदौड कायम राहणार का, याकडे आता मराठी चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख-सुहानाच्या पहिल्या झलकसाठी काउंटडाऊन सुरू! ‘किंग’च्या ट्रेलरची तारीख ठरली

Web Title: Aadi anant marathi movie box office collection first week 2 16 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज
1

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख-सुहानाच्या पहिल्या झलकसाठी काउंटडाऊन सुरू! ‘किंग’च्या ट्रेलरची तारीख ठरली
2

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख-सुहानाच्या पहिल्या झलकसाठी काउंटडाऊन सुरू! ‘किंग’च्या ट्रेलरची तारीख ठरली

DPIFF Awards 2026: ‘धुरंधर’चा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात डंका! रणवीर सिंह, अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा गौरव
3

DPIFF Awards 2026: ‘धुरंधर’चा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात डंका! रणवीर सिंह, अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा गौरव

Anupam Kher: एकच घर होतं, तेही आलिया भट्टला विकलं! अनुपम खेर यांनी संपत्तीच्या चर्चांवर सोडलं मौन
4

Anupam Kher: एकच घर होतं, तेही आलिया भट्टला विकलं! अनुपम खेर यांनी संपत्तीच्या चर्चांवर सोडलं मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.