भारतीय संघाचे सराव करतानाचे काही फोटो. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या विश्वचषकामध्ये केलेल्या कामगिरीनंतर आता पुन्हा संघामध्ये पुनरागमन करणार आहे, त्यामुळे त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे ओळखला जातो, तर रियान पराग सुद्धा टीम इंडियासाठी फलंदाजीमध्ये त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये प्रभावशाली कामगिरी करताना दिसला आहे.
संजू सॅमसनने भारतासाठी कमालीची कामगिरी केली आहे, त्याला विश्वचषकामध्ये संघामध्ये स्थान मिळाले होते परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली नाही त्यामुळे त्याच्या कामगिरीवर नजर असणार आहे.
मयंक यादव, हर्षित राणा, जितेश शर्मा यांच्या कामगिरीवर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे, भारतीय संघामध्ये दोन विकेटकिपर घेण्यात आले आहेत त्यामुळे कोण यष्टीरक्षक असेल यावर नजर असेल.
भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशविरुद्ध T२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीवर चाहत्यांच्या नजर असणार आहेत.
वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिष्णोई यांच्या फिरकीवर चाहत्यांची नजर असणार आहे, रवी बिष्णोईने झिम्बॉम्बे विरुद्ध कमालीची गोलंदाजी केली होती.
भारतीय संघामध्ये वरून चक्रवर्ती बऱ्याच वर्षानंतर संघामध्ये येत आहे, त्यामुळे संघामध्ये कमबॅक केल्यानंतर तो कशी कामगिरी करेल यावर नजर असेल.