एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पराभवाचा भारताच्या १४० करोड नागरिकांच्या डोळ्यात अश्रू. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघ भारतासाठी आपत्तीजनक ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत भारताच्या संघाने एकही सामना न गमावता टीम इंडियाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 240 धावांत गुंडाळले. या काळात टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज फ्लॉप दिसले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी एकही सामना गमावला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी सलग 9 साखळी सामने जिंकले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
उपांत्य फेरीतील सलग 10 वा सामना जिंकला. उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला दणदणीत पराभव पत्करावा लागला होता, जे त्यांच्यासाठी आयसीसी टूर्नामेंटमध्ये नेहमीच मोठे आव्हान होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
न्यूझीलंडसारख्या संघाला उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया सहज फायनल जिंकून एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. फोटो सौजन्य - सोशल मीडिया