V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा 'हे' आकर्षक पॅर्टन
व्ही नेक ब्लाऊजमुळे संपूर्ण बॉडीचा लुक बदलून जातो. मान लांब, चेहरा आणि बॉडी एका फ्रेममध्ये दिसू लागते. त्यामुळे या पॅर्टनमधील ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
लेहेंग्यावर फुल हँड ब्लाऊज अतिशय आकर्षक दिसतात. ब्लाऊजवर बारीक सोनेरी मणी, डायमंड किंवा नाजूक नाजूक मोत्यांचा वापर करून केलेले आरी वारी ब्लाऊजची शोभा वाढवेल.
एम्बेलिश्ड व्ही नेक ब्लाऊज सीक्विन, मोती किंवा झरीच्या लेहेंग्यावर शोभून दिसेल. या डिझाईनचा ब्लाऊज तुम्ही इतर कोणत्याही साडीवर घालू शकता.
बारीक अंगाच्या मुलींवर या पॅर्टनचे ब्लाऊज सुंदर दिसेल. कोणत्या साध्या साडीवर डायमंड वर्क केलेले ब्लाऊज परिधान केल्यास लुक मॉर्डन दिसेल.
लग्नातील लुकसाठी सगळ्यांचं हेवी डिझाईन केलेला लेहेंगा आणि ब्लाऊज हवा असतो. त्यामुळे तुम्ही या पॅर्टनमधील रेडिमेड लेहेंगा नक्कीच ट्राय करू शकता.