जगातली एकमेव जमात जिथे कुटुंबात मृत्यू झाला तर महिलांना भोगावी लागते शिक्षा; शरीराचा हा भाग कापून व्यक्त करतात दुःख
या प्रथेमध्ये जमातीच्या महिला मृताच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याच्या बोटांच्या वरचा भाग कापतात. ही एक वेदनादायक प्रक्रीया असते जी त्यांच्या प्रमाच्या आणि दुःखाच्या भावना प्रतिबिंबित करते.
बोट कापल्यानंतर रक्तप्रवाह होऊ नये यासाठी त्याला आधीच दोरीने बांधले जाते. त्यानंतर बोटाचा वरचा भाग दगड, कुऱ्हाड किंवा चाकूच्या मदतीने कापला जातो आणि विशिष्ट ठीकाणी याला पुरवण्यात येते
ही प्रथा जरी महिलांसाठी असली तरी पुरुषांसाठीही जमातीत एक वेगळी प्रथा आहे ज्यात पुरुष शोक व्यक्त करण्यासाठी आपल्या कानाचा काही भाग कापतात. पुरुष कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कठोर परीश्रम करतात ज्यामुळे त्यांना बोट कापू दिली जात नाही
दानी जमातीची ही प्रथा आध्यात्मिक श्रद्देचा एक भाग आहे. बोट कापल्याने मृत व्यक्तीचा आत्मा शांत होतो आणि जिवंताचे रक्षण होते अशी मान्यता आहे
दानी जमात वामोनाच्या बालीम खोऱ्यात राहते, जी उंत पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेली आहे. हा परिसर फार दुर्गम आहे, इथे फक्त विमानानेच पोहचता येते. बाहेरील जगाचा इथे फारसा प्रभाव नाही
इंडोनेशियन सरकारने काही वर्षांपूर्वी या वेदनादायक प्रथेवर बंदी घातली आहे मात्र जमातीतील काही वृद्ध महिला आजही गुप्तपणे याचे पालन करतात. पण आता ही प्रथा जुन्या पिढीपुरतीच मर्यादित आहे