स्वतःच्या लग्नात दिसल्या अप्सरेपेक्षाही सुंदर 'या' अभिनेत्री, जेनेलियापासून कियारापर्यंत पहा Unseen Photos
अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या लग्नात लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान करून त्यावर कुंदन दागिने आणि पंजाबी स्टाईल बांगड्या परिधान केल्या होत्या. तिचा हा लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
आलीय भट आणि रणबीर कपूर ही जोडी कायम सगळ्यांचं आवडते. आलिया भट्टने तिच्या ऑफ व्हाईट लग्नाचा लेहेंगा घातला जातो. लग्न सोहळ्यांमध्ये कायमच भडक रंगांचे घागरे घातले जातात. मात्र ही परंपरा मोडीत काढत तिने हेवी नक्षीकाम करून तयार केलेला लेहेंगा परिधान केला होता.
अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये खूप जास्त फेमस झाली आहे. तिचा वेडिंग लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडला होता. फिकट गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये कियारा अतिशय सुंदर दिसत होती.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांचे मराठमोळ्या पद्धतीने लग्न झाले होते. जेनेलियाने लग्नात मुंडावळ्या बांधून सुंदर लुक केला होता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नसोहळ्यातील रिसेप्शन लूकसाठी अनुष्काने लाल भडक रंगाचा बनारसी शालू नेसला होता. त्यावर कुंदनचे दागिने आणि बन हेअर स्टाईल केली होती.