Fashion Trend: काश्मिरी घुंगरू बांगड्यांची वाढती क्रेझ! सण-समारंभात खुलून दिसेल मराठमोळा हटके लुक
सध्या सोशल मीडियावर काश्मिरी घुंगरू बांगड्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या बांगड्या कोणत्याही साडी, ड्रेस आणि इंडोवेस्टन कपड्यांवर अतिशय सुंदर दिसतात.
मल्टीकलर रेनड्रॉप बांगड्यांमध्ये तुम्ही काश्मिरी घुंगरू बांगड्या घातल्यास तुमचा हात भरगच्च आणि आकर्षक दिसेल. इतर कोणत्याही बांगड्या घालण्याची आवश्यकता नाही.
नवविवाहित स्त्रियासुद्धा हातामध्ये काश्मिरी घुंगरू बांगड्याचा सेट परिधान करू शकता. गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
काश्मिरी घुंगरू बांगड्या १०० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन आणि रंग बाजारात उपलब्ध आहेत.
काश्मिरी घुंगरू बांगड्यांचे कडे सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. कडे परिधान केल्यानंतर इतर कोणत्याही बांगड्या घालण्याची अजिबात आवश्यकता नाही.