आयपीएलच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स ठोकणारे फलंदाज. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
2012 मध्ये रॅायल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ख्रिस गेल याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॅार्ड नावावर केला होता. हो रेकॅार्ड त्याने राहुल शर्मा याच्या विरूध्द केला होता. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
2020 मध्ये राहुल तेवतिया याने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती, त्याने जमाइकाचा शेल्डन कॉट्रेलच्या विरूध्द त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार ठोकले होते. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
भारताचा स्टार अष्टपैलु रविंद्र जडेजा याने देखील हा विक्रम नावावर केला आहे. 2021 मध्ये हर्षल पटेलच्या विरोधात रविंद्र जडेजाने पहिल्या 3 बॅालमध्ये 3 षटकार मारले होते तर तिसरा बॅाल नो बॅाल झाला त्यामुळे आणखी एक बॅाल एक्ट्रा मिळाला. त्यानंतर त्याने 6, 2, 6, 4 असे मारले आणि एकाच ओव्हरमध्ये 37 धावा केल्या. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
रिंकु सिंगची धुव्वादार खेळी प्रतेकाच्याच लक्ष्यात आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारले आणि स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्याने हा पराक्रम 2023 मध्ये यश दयालच्या विरोधात केला होता आणि सामना केकेआरने जिंकला होता. फोटो सौजन्य -IndianPremierLeague
आयपीएल 2025 मध्ये हा विक्रम रियान परागने कोलकता विरूध्द मोइन अलीच्या विरोधात केला पण हा सामना राजस्थानच्या संघाला 1 धावेने गमवावा लागला होता. फोटो सौजन्य - IndianPremierLeague