उपाशी पोटी खाल्ले 'हे' पदार्थ शरीरात वाढवतात ॲसिडीटी
उपाशी पोटी लिंबू, संत्री किंवा मोसंबीचे अजिबात सेवन करू नये. या फळांमध्ये असलेल्या घटकांमुळे ॲसिडीटी वाढून डोकेदुखी, आंबट ढेकर किंवा उलट्या होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी आंबट फळे खाऊ नये.
सकाळच्या नाश्त्यात काहींना फोडणीचा भात, मसालेदार भाजी किंवा इतर तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. या पदार्थांच्यय सेवनामुळे ॲसिडीटी आणि उलट्यांचा त्रास होऊन पोट बिघडते.
उपाशी पोटी दही खाल्ल्यामुळे पोटात आम्ल्पित्त वाढते आणि आंबट ढेकर, उलट्या किंवा मळमळ होते. दह्यामध्ये प्रोबायोटीक असते, त्यामुळे कोणत्याही वेळी दही खाऊ नयेत.
उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक काढा प्यावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
ब्रेड, पाव, केक, बिस्किटं, टोस्ट इत्यादी मैद्यापासून बनवलेले पदार्थ सकाळच्या वेळी अजिबात खाऊ नका. हे पदार्थ पचनासाठी अतिशय जड असतात.