लिव्हरसाठी दारुपेक्षाही घातक ठरतात 'हे' चविष्ट पदार्थ, रोजच्या आहारात अजिबात करू नका सेवन
सकाळच्या नाश्त्यात काहींना फळांचा रस पिण्याचा सवय असते. पण फळांचा रस प्यायल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होण्याची शक्यता असते. मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, फळांचे पॅक ज्यूस, कुकीज इत्यादी पदार्थांमध्ये खूप जास्त साखर असते.
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राइज, पॅक फूड आणि फास्ट फूड इत्यादी पदार्थ सहज पचन होत नाही. खाल्लेले अन्नपदार्थ पचन न झाल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. हे घटक लिव्हरचे नुकसान करतात.
शरीरासाठी रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट अतिशय घातक आहेत. रोजच्या आहारात या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. रेड मीटमध्ये असलेले घटक लिव्हरला हानी पोहचवतात.
रोजच्या आहारात जास्त मीठ असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास खूप जास्त तहान लागणे, वारंवार लघवीला होणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. तसेच जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होते.
रिफाइंड कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचे रोजच्या आहारात अतिशय कमी प्रमाणात सेवन करावे. पांढरा भात, ब्रेड किंवा मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये खूप कमी प्रमाणात फायबर असते.