किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
क्रॅनबेरी ज्यूस मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मदत करतो. यामुळे मूत्राशय आणि मूत्रपिंडांमध्ये साचलेले बॅक्टरीया बाहेर काढून टाकण्यासाठी क्रॅनबेरी ज्यूसचे सेवन करावे.
लिंबूमध्ये सायट्रेटऍसिड असते, ज्यामुळे मूत्रपिंडात स्टोन होत नाही. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास लिंबू पाण्याचे सेवन केल्यास किडनीमधील घाण बाहेर पडून जाईल.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. शरीराला थंड करण्यासाठी आणि किडनीमधील घाण स्वच्छ करण्यासाठी काकडी डिटॉक्स पेयाचे सेवन करावे.
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मूत्रपिंडात वाढलेले संक्रमण आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी नियमित आल्याच्या चहाचे सेवन करावे.
आयुर्वेदात बार्लीचे पाणी मूत्रपिंडांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या पेयाच्या सेवनामुळे किडनीमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. तसेच किडनीच्या गंभीर आजारांची शरीराला कधीच लागण होत नाही.