हाताचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी नाजुक दंडावर घाला सुंदर बाजुबंद
नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर सोन्याचे दागिने प्रामुख्याने घातले जातात.त्यामुळे साडीवरील लुकची शोभा वाढवण्यासाठी दंडामध्ये तुम्ही बाजूबंद परिधान करू शकता.
बाजरात १ ग्रॅम सोन्यामध्ये सुद्धा बाजूबंद उपलब्ध आहेत. अगदी २०० रुपयांपासून ते अगदी ५००० किमतींपर्यंत बाजूबंद उपलब्ध आहेत.
टेम्पल दागिन्यांप्रमाणे टेम्पल आणि साऊथ इंडियन पॅर्टनमधील बाजूबंद बाजारात उपलब्ध आहेत. साऊथ इंडियन केल्यानंतर त्यावर टेम्पल डिझाईन बाजूबंद घालावे.
हल्ली मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग केली जाते. त्यामुळे तुम्ही बारीक मण्यांच्या बाजुबंदाची खरेदी करू शकता. या डिझाईनचे बाजूबंद कोणत्याही साडीवर सुंदर दिसेल.
मोती आणि इतर रत्नांचा वापर करून बनवलेले सुंदर बाजूबंद हातांची शोभा वाढवते. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात साडीवर तुम्ही बाजूबंद घालू शकता.