लग्नासाठी पारंपरिक साड्या
बाजारामध्ये इरकली साड्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातील काही साड्या हातमागावर तयार केल्या जातात. ही साडी नेसल्यानंतर पारंपरिक लुक दिसतो.
केरळमध्ये प्रसिद्ध असलेली कसावू साडी लग्नामध्ये नेसली जाते. या साडीचा रंग पूर्णपणे सफेद असतो आणि या साडीचे काठ सोनेरी रंगाचे असतात.
तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेली कांजीवरम सिल्क साडी नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसते. या साडीचा काठ आणि रंग उठावदार असतो.दक्षिण भारतासह इतर सर्वच ठिकाणी लग्नात कांजीवर, सिल्क साडी नेसली जाते.
नववधूच्या शालूमध्ये नवरी प्रामुख्याने बनारसी साडी नेसण्यास जास्त प्राधान्य देतात. बनारसी साडीवर सोन्याच्या जरीचे हेवी वर्क केलेले असते. पण हल्ली शालू नेसण्याऐवजी पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य दिले जाते.
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळख असलेली पैठणी साडी तुम्ही लग्नातील कोणत्याही विधीसाठी नेसू शकता. पैठणी साडी अंगावर चापून चोपून बसते. शिवाय पैठणी साडी नेसल्यानंतर पारंपरिक लुक दिसतो.