Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Upcoming Bikes: नव्या ६ बाइक्ससह रॉयल एनफिल्ड बाजारात धुमाकूळ घालणार! पाहा कोणत्या असतील या दमदार बाईक्स

भारतीय दुचाकी क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणारी 'रॉयल एनफिल्ड' कंपनी आता आगामी काळात मोठ्या बदलांसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वाहनप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे कंपनी भारतीय बाजारात लवकरच एकापेक्षा एक ६ भन्नाट आणि शक्तिशाली बाइक्स लाँच करणार आहे. यामध्ये केवळ क्लासिक मॉडेल्सच नाही, तर उच्च क्षमतेच्या ७५०cc इंजिन असलेल्या ३ नवीन आणि धाकड बाइक्सचा समावेश आहे. यासोबतच अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी ४४०cc आणि ४५०cc सेगमेंटमधील नवीन पर्याय आणि भविष्यातील ई-व्ही तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर बाइक देखील बाजारात धडकणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी अत्यंत खास आणि उत्सुकतेची ठरणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 02, 2026 | 06:28 PM
Follow Us
Follow Us:
1 / 6

रॉयल एनफिल्ड हिमालयन ७५० (Royal Enfield Himalayan 750) रॉयल एनफिल्डच्या आगामी पोर्टफोलिओमधील ही सर्वात बहुप्रतिक्षीत बाइक मानली जात आहे. ही बाइक सध्याच्या हिमालयन ४५० च्या वरच्या सेगमेंटमध्ये असेल आणि यामध्ये नवीन ७५०cc पॅरेलल-ट्विन इंजिन दिले जाईल. चाचणीदरम्यान दिसलेल्या मॉडेलनुसार यात USD फोर्क्स, मोठी इंधन टाकी, स्पोक व्हील्स आणि मजबूत अ‍ॅडव्हेंचर चेसिस मिळतील. हे इंजिन सध्याच्या ६४८cc पेक्षा जास्त पॉवर देईल. यात ६-स्पीड गिअरबॉक्स आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विशेष डिझाइन असेल. ही बाइक २०२६ च्या शेवटी किंवा २०२७ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे.

2 / 6

रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेन्टल जीटी ७५० (Royal Enfield Continental GT 750) कंपनीच्या नवीन ७५०cc प्लॅटफॉर्मवर आधारित ही दुसरी प्रमुख बाइक असेल. ही कॅफे रेसर बाइक दिसायला सध्याच्या GT 650 सारखीच असेल, मात्र मोठ्या इंजिनमुळे तिचा परफॉर्मन्स अधिक दमदार असेल. ७५०cc इंजिनमुळे या बाइकला अधिक पॉवर आणि टॉर्क मिळेल, ज्यामुळे बाइक प्रेमींना क्लासिक लूकसोबतच आधुनिक परफॉर्मन्सचा अनुभव घेता येईल. ही बाइक २०२६ च्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.

3 / 6

रॉयल एनफिल्ड हिमालयन ४४० (Royal Enfield Himalayan 440) सध्या बाजारात हिमालयन ४५० उपलब्ध असताना, कंपनी जुन्या स्टाइलमधील सोपी आणि परवडणारी हिमालयन पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Scram 440 मधील ४४३cc LS440 इंजिन वापरले जाऊ शकते, जे २५.४ bhp पॉवर आणि ३४ Nm टॉर्क जनरेट करते. हिमालयन ४५० च्या खाली एक अधिक परवडणारा अ‍ॅडव्हेंचर बाइक पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

4 / 6

रॉयल एनफिल्ड स्क्रॅम ४५० (Royal Enfield Scram 450) हिमालयन ४५० चे 'शेरपा' इंजिन आता अधिक रोड-फोकस्ड पॅकेजमध्ये म्हणजेच स्क्रॅम ४५० मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये ४५२cc लिक्विड-कुल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन दिले जाईल, जे ४०.०२ PS पॉवर आणि ४० Nm टॉर्क देते सोबतच ६-स्पीड गिअरबॉक्स असेल. हिमालयनच्या तुलनेत ही बाइक आकाराने लहान, कमी उंचीची आणि रोजच्या शहरांमधील वापरासाठी अत्यंत सोयीस्कर असेल.

5 / 6

फ्लाइंग फ्ली S6 - इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर (Flying Flea S6 Electric Scrambler) रॉयल एनफिल्ड आपल्या 'फ्लाइंग फ्ली' (Flying Flea) या सब-ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात उतरवत आहे. S6 हे मॉडेल स्क्रॅम्बलर डिझाइनवर आधारित असून ते शहरी भाग आणि हलक्या ऑफ-रोडिंगसाठी योग्य असेल. फ्लाइंग फ्ली C6 प्रमाणेच यात ३.९१ kWh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी १५४ किमीची रेंज आणि ११५ किमी/तास इतका सर्वोच्च वेग देण्यास सक्षम असेल. ही इलेक्ट्रिक बाइक २०२६ च्या शेवटी लाँच होण्याची अपेक्षा आहे.

6 / 6

रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ७५० (Royal Enfield Interceptor 750) प्रसिद्ध 'इंटरसेप्टर ६५०' चे हे अधिक शक्तिशाली व्हर्जन असणार आहे. ही बाइक रिलॅक्स्ड रोडस्टर लूक कायम ठेवेल, मात्र ७५०cc इंजिनमुळे तिला अधिक ताकद मिळेल. ज्यांना अ‍ॅडव्हेंचर किंवा कॅफे रेसर बाइक नको आहे, पण एक शक्तिशाली आणि आरामदायी क्लासिक बाइक हवी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरेल.

Web Title: Upcoming royal enfield bikes auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!
1

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
2

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
3

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
4

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.