मानसिक तणावापासून कायमची मिळेल सुटका! 'या' पद्धतीने करा तुळशीच्या पानांचा वापर
तुळशीमध्ये असलेले ऍडॅप्टोजेन नावाचा घटक शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. यामुळे चिंता आणि नैराश्य कमी होते आणि तुम्ही कायमच आनंदी दिसू लागता.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यासोबतच मानसिक स्पष्टता वाढून एकाग्रता वाढण्यास मदत होते.
तुळस शरीरातील कोर्टिसोलची कमी करते, ज्यामुळे मज्जासंस्था निरोगी राहते. चांगली झोप येण्यासाठी तुळशीची पाने प्रभावी ठरतात. त्यामुळे नियमित दोन किंवा तीन तुळशीची पाने चावून खावीत.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. तुळशीची पाने पाण्यात उकळवून घ्या आणि नंतर त्यात मध मिक्स करून सेवन करा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावात जगात आहे. तणाव वाढल्यानंतर मनासोबतच शरीराला सुद्धा हानी पोहचते. त्यामुळे कायमच आनंदी राहावे.